- होण्ग्कोंग या शब्दाचा 'सुवासिक बंदर' हा चीनी अर्थ होतो.
-होण्ग्कोंग बंदर ब्रिटीशांकडे १०० वर्षे होते.१९९७ साली त्यांनी ते चीनला परत केले.
-होण्ग्कोंगमध्ये 'विक्टोरिया पीक'हे शिखर आहे.
२)मकाव :
-सोळाव्या शतकात ब्रिटीशांची जहाजं या चीनच्या या किनाऱ्याला लागली.त्यावेळी इथल्या दरोडेखोरांचा नायनाट केल्याबद्दल चीनने आपल्या दक्षिण किनारयावरचा
२० चौरस कि.मीचा तुकडा पोर्तुगीजांना वसाहतीसाठी दिला.तेच मकाव.
-२० डिसेंबर १९९९ रोजी चीनने परत मकाव आपल्या ताब्यात घेतला.
३)ससून रुग्णालय:
-दक्षिण महाराष्ट्रातील लाखो रुग्णांच्या सोयीसाठी पुण्यात ससून रुग्णालयाची व मेडीकल कॉलेजची स्थापना 'सर व्हिक्टर ससून' या मुळच्या बगदादी व नंतर भारतात
काही वर्ष व नंतर शांघायला राहिलेल्या ज्यूने केली.
४)जॉर्डन:
-पहिल्या महायुद्धानंतर दुर्बल झालेल्या आटोमन साम्राज्याची पुनर्रचना करून ग्रेट ब्रिटनने 'जॉर्डन'हा देश निर्माण केला.
५)केरो लक्ष्मण छत्रे:
-यांना लहानपणापासून गणितविद्येचा नाद फार होता.तो इतका कि,जेवत असताना भाताच्या आकृती करून त्याविषयीच्या विचारात केरोनानांचे मन एकदा गुंतले
कि त्यांना जेवणाचा विसर पडत असे.सूर्यावरचे डाग आणि पृथ्वी वरचे वातावरण यांचा निकटचा संबंध आहे असे त्यांचे मत होते.