तुळापूर
शहाजी राजे आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर नांगरगावी पडला होता.मुरार जगदेवास आपल्या
बैठकीच्या हत्तीची तुला करण्याची इच्छा झाली पण एवढा थोर बच्चा कसा जोखावा याची उकल मात्र काही केल्या त्याला होईना .मग शहाजीराज्यांनी पुढं होऊन त्याला
तोड सांगितली.हत्तीचा बच्चा भीमा आणि इंद्रायणी यांच्या संगमातील डोहाच्या नावेत चढविण्यात आला.त्या वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खुण करून घेतली.मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव डूबेल एवढे दगड धोंडे नावेत चढविले आणि त्या दगडांच्या भाराइतक सोनंनाणं दान करण्यात आलं.तेव्हापासून त्या 'नांगरवासास' 'तुळापूर' म्हणतात.
संदर्भ पुस्तक : छावा
लेखक : शिवाजी सावंत
Thursday, 22 April 2010
तुळापूर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment